
नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa
सोनई येथील दरंदले परीवाराने स्व.अरुणराव नेमू दरंदले यांच्या दशक्रियाविधी निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून नेवासाफाटा येथील शरणपुर अनाथ आश्रमास एक महिन्याचा किराणामालाची मदत दिली.
दै.सार्वमतचे सोनई येथील जेष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोपानराव दरंदले व पत्रकार विनायक दरंदले यांचे बंधू अरुणराव दरंदले यांचे निधन झाले. स्व.दरंदले यांच्या दशक्रियाविधी निमित्त सोपानराव दरंदले, राजेंद्र दरंदले व पत्रकार विनायक दरंदले यांच्या हस्ते अनाथ आश्रमास आवश्यक किराणा साहित्य व खाऊ देण्यात आला. यावेळी अक्षय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी स्वागत केले. सर्जेराव काळे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. पत्रकार चंद्रकांत दरंदले, तुकाराम निमसे, राहुल येळवंडे, सुनिल दरंदले, अमोल दरंदले, अनुराधा संतोष, सोनवणे, विजय भुसाळ, सुधीर दरंदले, किरण दरंदले, अनाथ आश्रम सचिव सुरेखाताई मगर, ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे, बाळासाहेब देवखिळे, सुधीर चव्हाण, व्यवस्थापक ज्योती मगर उपस्थित होते.संतोष मगर यांनी आभार मानले.