जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; पुन्हा पाच दिवसांचा यलो अर्लट

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; पुन्हा पाच दिवसांचा यलो अर्लट

अहमदनगर | प्रतिनिधी

सततच्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाली असून खरीप हंगामातील पिके सडली आहेत.तर रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पुन्हा जिल्ह्यात शुक्रवारपासून मंगळवार (दि.11) पर्यंत पावसाचा यलो अर्लट जारी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांसह सामान्य नागरिक, चाकरमानी आणि शाळकरी विद्यार्थ्यां हे धास्तावले आहे.

गुरूवारी रात्रीभर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस नेवासा बु. येथे 99 मिली मीटर झाल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे अकोले आणि संगमनेर तालुक्यात गुरूवारी रात्रीचा पाऊस झाल्या नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात शुक्रवारअखेर 635.8 मिली मीटर पाऊस झालेला असून त्याची सरासरी ही 137.2 टक्के आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भाजीपाला, चारा पिकांना मोठा फटका बसला असून सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

गुरूवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून यात नालेगाव 27.5, सावेडी 26, कापूरवाडी 26, भिंगार 30.5, चिचोंडी 30.5, वाळकी 29, रुईछत्तीसी 44.5, श्रीगाेंंदा 58, काष्टी 57.3, मांडवगण 40, चिंभळा 35.8, देवळगाव 34, कोळगाव 34.5, कर्जत 49.3, राशिन 36.3, भांबोरा 26.5, कोंभळी 48.3, मिरजगाव 56, माहिजळगाव 49.3, जामखेड 29.5, अरणगाव 37.3, खर्डा 62.3, नान्नज 41.8, नायगाव 28, शेवगाव 39.3, भातकुडगाव 39, बोेधेगाव 56.3, चापडगाव 56, एरंडगाव 39.5, टाकळी 21.3, कोरडगाव 21.3, मीरी 24.5, पाथर्डी 20, नेवासा खू. 99.3, नेवासा बु.44, सलाबतपूर 27.8, कुकाणा 32.8, चांदा 39.8, घोडेगाव 20.3, सोनई 62.3, वडाळा 37.5, राहुरी 25.5, देवळाली 22, टाकळीमियॉ 22, ब्राम्हणी 62, कोपरगाव 28.5, रवांदे 38.8, सुरेगाव 38.8, दहीगाव 22.5, श्रीरामपूर 38.3, उंदीरगाव 50.3, टाकळीभान 44, राहाता 23.8, शिर्डी 26.3, लोणी 30.5, बाभळेश्‍वर 30.5.

दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळ्या यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून खरीप हंगामातील पिकांना या मोठा फटका बसला आहे. शेवगावच्या शहर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनूसार शेवगावसह परिसरातील सालवडगाव, आखेगाव आदीगावांना काल दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले.  तालुक्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती.

शुक्रवारीही तालुक्यातील दहीगाव ने, शहरटाकळी, देवटाकळी, बक्तरपूर, खामगाव, जोहरापूर, क-हेटाकळी, खानापूर, घोटण परिसरात जोरदार पाउस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिके अडचणीत सापडल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. भातकुडगाव फाट्या नजीकच्या बक्तरपूर ओढ्याला पाणी आल्याने दहीगाव मार्गे शेवगावकडे येणारी वाहतूक सकाळी काही वेळ ठप्प झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील विविध परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी शेतकरी नागरिकांना अजूनही जोरदार पावसाची आस लागून राहिली आहे.  

नगरमध्ये पावसाची रिपरिप

नगर शहरात काल सकाळी आणि त्यानंतर दुपारी चारनंतर राहून राहून पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे अनेक भागात साठले होते. तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात साठून दुचाकी आणि चार चाकी स्वार यांना त्याचा फटका बसत होता. विशेष करून सायंकाळी कामावरून सुटलेल्या कर्मचार्‍यांना या पावसाचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com