नगरमध्ये अतिवृष्टी; संगमनेर, श्रीरामपूरमध्ये दमदार पाऊस

21 महसूल मंडलात शनिवारी पावसाची हजेरी
नगरमध्ये अतिवृष्टी; संगमनेर, श्रीरामपूरमध्ये दमदार पाऊस
पाऊस

अहमदनगर (प्रतिनिधी)

हस्त नक्षत्रातील शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला.

यात नगर शहरातील नालेगाव महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून संगमनेर आणि श्रीरामपूर मंडलातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आतापर्यंत 663.9 च्या सरासरीने 141.2 टक्के पावसाची नोंद झालेली आहे.

शनिवारी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यात नगर शहराला पावसाने धुवूनच काढली. जिल्हा प्रशासनाकडील रविवारच्या आकडेवारीत नालेगाव मंडला 80, सावेडी 48.8, कापूरवाडी 29.5, केडगाव 49.3, नागापूर 28.3, वाळकी 37.3 असा पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर मंडलात 45, बेलवंडी 23.3 (श्रीगोंदा), कोंभळी 29.3 (कर्जत), खर्डा 29.3 (जामखेड), ब्राम्हणी 32.3, वांबोरी 37.5 (राहुरी), संगमनेर 55.8, डोळसणे 29.5, दहीगाव बोलका 31.8 (कोपरगाव), श्रीरामपूर 42.5, बेलापूर 28.5, उंदिरगाव 47 (श्रीरामपूर), शिर्डी 23.5, लोणी 32.3 आणि बाभळेश्वर 43.3 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.

आता स्वाती नक्षत्र बाकी

रविवारपासून सुर्याने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला असून या नक्षत्राचे वाहन मोर आहे. आता शेवटचे स्वाती नक्षत्र असून चित्रा नक्षत्रात पाऊस पडू नये, अशी शेतकर्‍यांची धारणा असून यामुळे शेतीचे नुकसान होते. मात्र, शेवटच्या स्वाती नक्षत्रात पाऊस झाल्यास शेतात मोती पिकतात अशी अख्यायिका आहे.

Related Stories

No stories found.