वैजापूरसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

वैजापूरसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

वैजापूर | प्रतिनिधी

जोरदार पाऊस आणि तुफान वादळ वा-याने शनिवारी रात्री शहर व ग्रामीण भागाला जोरदार तडाखा दिला. तासभर पाऊसामुळे या भागात नुकसानीचा मोठा हाहाकार उडाला. जोरदार गतीचे वेगाचे वादळवारा आणि पाऊसामुळे ग्रामीण भागात शेत पिकांवर नुकसानीचा नांगर फिरवला गेल्याची स्थिती निर्माण झाली.

दहा ते बारा गावात परतीच्या पाऊसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत वाहक ताराची नासधूस झाली. भऊर, गोयेगाव, डवाळा, खंबाळा भग्गाव, किरतपूर, वैजापूर ग्रामीण दोन भागात गारपिटीचा पाऊस कोसळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान पाऊसाच्या तडाख्यात शेतातील कापूस, मका, ऊस, सोयाबीन तूरीचे उभे पीके आडवी पडली आहेत.

सांयकाळी आठ वाजेच्या दरम्यान जोरदार वादळ वारे व त्यांनतर जोरदार पाऊस कोसळल्यामुळे शेतातील पिकांना नुकसानीची झळ बसली. अनेक ठिकाणी वादळामुळे वृक्ष उन्मळून पडली आहेत. महावितरण कंपनीचे वीज प्रवाह वितरण करणा-या खांबाची अनेक ठिकाणी मोडतोड होऊन शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. रविवारी पाऊसामुळे कोणत्या गावात नुकसानीची तीव्रतेचे प्रमाण कळून येईल.

गारपीटीमुळे कापुस, मका, बाजरी, ऊस, सोयाबीन आदी पिकांना व पपई, मोसंबी, डाळिंब या फळबागाना मोठ्या प्रमाणात फटाका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कापुस व मकाच्या पिकांचे अतोनात नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना या पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com