PHOTO : पारनेर तालुक्याला जोरदार पावसाचा तडाखा

गारखिंडी, कळस, अळकुटीसह परीसरात ढगफुटी; रस्ते, पुल, शेतीचे मोठे नुकसान
PHOTO : पारनेर तालुक्याला जोरदार पावसाचा तडाखा

पारनेर | तालुका प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून पारनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला असुन काही ठिकाणी पावसाने रुद्र रुप धारण करुन शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे .

तालुक्यातील गारखिंडी, कळस, अळकुटी, कासारे, रांधे, शेरी कासारे, दरोडी परीसरात झालेल्या ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते, पुल, शेतीचे मोठे नुकसान झाले याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गारखिंडी सह परीसरात ढगफुटीचा प्रकार झाला. त्यामध्ये गावांमधील बांध बंदिस्तीचे नुकसान झाले आहे. गारखिंडीमधील गारखींडी ते पिंपळगाव दळणवळणाचा पूल वाहून गेला आहे. गारखिंडी ते अळकुटी दरम्यान असणारे दोन पूल खचले गेले. त्यामुळे गारखिंडी ते आळकुटीचा प्रवास पूर्णपणे ठप्प झाला आहे.

सोयाबीन, मुग, बाजरी, उडीद, कांद्याची रोप या पिकांचे नुकसान झाले आहे. हे पिके पाण्याखाली गेले आहेत. ओढ्यांना नदीचे स्वरूप आले आहे. गारखिंडी मधील पर्जन्यमापक यंत्र आहे त्यामध्ये साडेसहाशे मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. आशी माहीती संतोष झिंजाड यांनी दिली.

शेतकऱ्यांचे बांधबंधिस्ती फुटून गेलेले आहे त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची मातीची झीज झालेली आहे. ९१२ हेक्टर जमीन आहे किती टन माती वाहून गेली असेल याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच निवृत्ती चौधरी, उपसरपंच गुलाब चौधरी, संजय शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक विश्वनाथ झिंजाड, संतोष झिंजाड, गोरख झिंजाड, संपत निमसाखरे, विलास निमसाखरे, भरत झिंजाड, सोमनाथ झिंजाड, दत्ता शिंदे, माणिक झिंजाड, भरत पुजारी यांनी केली आहे.

रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य चालू होतं लोकांना ओढ्याच्या पलीकडे अलीकडे घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जय हनुमान मित्र मंडळ व शिव झुंजार मित्र मंडळ च्या मुलांनी मोठ्या प्रमाणात मदतीसाठी कष्ट केले जनावरे व शेतामध्ये गेलेल्या लोकांना पुराच्या पाण्यापासुन वाचविले.

झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. रस्ते, पुल याबाबत विभागाला माहीती कळवली आहे. ज्या ठिकाणी माती वाहुन गेली आहे तेथील पंचनामे करण्यात येतील. शेत पिकांच्या नुकसानीबाबत वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पंचनामे करण्यात येतील

शिवकुमार आवळकंठे, तहसिलदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com