सुपा परिसरात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस

सुपा परिसरात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस

पारनेर | तालुका प्रतिनिधी

गुरुवारी सांयकाळी ऐन लक्ष्मी पुजनाच्या वेळी सुपा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रस्तावरील दुकानदार विक्रेत्याची धावपळ उडाली.

सांयकाळी ५.४५ ला लक्ष्मीपुजनाची वेळ जवळ आलेली आसताना पुजेचे साहित्य महालक्ष्मी, फळे, फुले सह इतर साहित्य खरेदी करण्यात नागरिक व्यस्त असताना जोरदार विजाच्या कडकडाटासह वादळी वारा सुटला व काही कळायच्या आत जोरदार वाऱ्यासह पावसास सुरवात झाली.

यावेळी बाजारपेठे मोठी गर्दी झाली होती. आचानक जोरदार पावसास सुरवात झाल्याने रस्तावरील विक्रेते फटाका स्टाँल याची खुपच धावपळ झाली तर खरेदीसाठी आलेल्या नागरिकाचीही चांगली ताराबळ उडाली. यात फटाके विक्रेते याचे चांगल्या प्रकारे नुकसान झाले.

ऐन ग्राहक येण्याच्या वेळी पावसाने गराडा घातल्याने मालही भिजला व विक्रीवरही परिणाम झाला. तर पुजेचे साहित्य फळे फुले रांगोळी कलर गृह सजावटीचे सामान विक्रेते व कागदी आकाश कंदील याचे चांगल्या प्रकारे नुकसान झाले. तर वारा व पावसाच्या जोरामुळे भाजीपाला व फळे याचे नुकसान झाले तर काही विक्रेत्याचे विक्री साहित्य

ऐन लक्ष्मी पुजनाच्या वेळेला लक्ष्मीच्या पावलांनी पावसाचे आगमन झाले हा पाऊल सध्या कांदा ज्वारी आदी पिकासाठी चांगला फलदायी आहे. कारण शेती पंपाची वीजेचा लपंडाव चालू आसताना या पावसाने शेतकऱ्यांच्या भरणीता तान वाचला असला तरी हा पाऊस सुपा शहराच्या एक किमी ञिजेतच पडला आहे . हाच पाउस लगतच्या चार सहा गावानी झाला असता तर शेतकऱ्यांना रात्री पाणी भरण्याच्या कामात मोठा हातभार मिळाला असता परंतु पडलेला पाऊस हा सुपा शहरा परिसरातच पडल्याने आजुबाजुच्या गावातील शेतकरी हिरमुसले गेले .

ऐन दिपावलीच्या दिवशी लक्ष्मीपुजनाची धामधुम चालू आसताना पावसाने गराडा घातल्याने विक्रेते दुकानदार व ग्राहकाची चांगलीच धावपळ उडाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com