अतिवृष्टी पंचनामे करून शेतकर्‍यांची वसुली थांबवा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ‘छावा’ ची मागणी
अतिवृष्टी पंचनामे करून शेतकर्‍यांची वसुली थांबवा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अतिवृष्टीचे पंचनाम्यासाठी अधिकारी येईपर्यत खळे झाले तरी पंचनामा करावा, तसेच ऑक्टोबर महिन्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच सर्व प्रकारच्या कर, कर्ज, पाणीपट्टी, ग्रामपंचयत थकबाकी वसुलीस स्थगिती मिळावी यासाठी छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अहमदनगर येथे भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात नगर, पाथर्डी, शेवगाव, तालुक्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानी, पीक नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहयक शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहचेपर्यत काही शेतकर्‍यांनी सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते म्हणून ते पाण्यातून सोंगून खळे केले. सोयाबीन, बाजरी, उडीत, मूग, भुईमूग, मका खळे झालेले पंचनामे व्हावेत, तसेच आकटोबर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून आवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेत.

पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यातील पशुधन हानीसाठी जिल्हा परिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखल देऊन सादर योजनेत प्राधान्याने इतर कोणतेही निकष न लावता पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून निवड करावी, तसे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावेत. पंचनामे होऊन मदत नाही, तोपर्यत सरकारी थकबाकी, बैंक कर्ज वसुली, पाणीपट्टी, ग्रापंचयत थकबाकी, शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी. शासनाने एकरी 50हजार रुपये मदत घ्यावी. पीक विमा 100% मंजूर करावा यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्यासह जिल्हा सारचिटणीस प्रवीण देवक, दत्ता वामन, शैलेश धुमाळ यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com