अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकर्‍यांना 3 हजार 500 कोटीची मदत - ना. विखे

अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकर्‍यांना 3 हजार 500 कोटीची मदत - ना. विखे

राहाता |वार्ताहर| Rahata

राज्यात अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकर्‍यांना 3 हजार 500 कोटी रुपयांच्या मदतीचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही आशी ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे यांनी राहाता तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत झालेल्या गावांची पाहणी केली. मोठ्या स्वरुपातील पावसाने शहरातील व्यावसायिकाच्या झालेल्या नूकसानीचा आढावा घेवून उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनास दिल्या. राहाता येथे माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यात आतापर्यत झालेल्या अतिवृष्टीमुळे 23 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी अद्यापही पाऊस सुरूच असल्याने नूकसानीचे आकडे वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून मदतीच्या अंमलबजावणीचा आदेशही निर्गमित झाला असल्याचे सांगून, लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात मदत वर्ग होईल.एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची काळजी शासन निश्चित घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील इतर आकडेवारी पाहाली तर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव अटोक्यात ठेवण्यात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

बाधीत झालेल्या गावांचा आढावा आपण घेतला असून समोर आलेल्या परीस्थीती नूसार सर्वच जनावारांचे लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. खासगी डॉक्टरांची मदत घेवून लसीकरणाचे व उपाय योजनांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com