अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर

अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य सरकारने (State Government) खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीपोटी (Heavy Rain Crop Loss) मदतीची घोषणा केली आहे. जिल्ह्यासाठी जवळपास तिनशे कोटीचा निधीही दिल्याचा शासन निर्णय निघाला आहे. मात्र त्यानंतर जवळपास दीड महिना उलटला तरी शेतकर्‍यांच्या खात्यावर या रकमा जमा न झाल्याने जिल्हा प्रशासनाला (District Administration) याचा विसर पडला की काय अशी चर्चा शेतकर्‍यांमधून होत आहे. प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी होत आहे.

अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर
महापालिकेसमोर साकारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा

ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे (Kharif Crops) प्रचंड नुकसान झाले.शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍याना मदतही जाहीर केली. चार महिने झाले मात्र शेतकर्‍यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचा शासनादेश काढलेला आहे हा आदेश निघून जवळपास दीड महिना उलटून गेला आहे.

अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर
बारागाव नांदूरच्या महिला वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

मात्र अद्याप नुकसानग्रस्त (Damaged) शेतकर्‍यांच्या खात्यावर एक छदामही जमा झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडे (District Administration) उपलब्ध झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र दप्तर दिरंगाईमुळे अद्याप हा निधीचे वाटप झालेला नाही. खरीप पिकांचे (Kharif Crop) प्रचंड नुकसान होऊन चार महिने होऊन गेले आहेत. मात्र अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना प्रंचड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी होत आहे.

अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर
शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ
अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर
शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देतो म्हणत 55 लाख रुपयांची फसवणूक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com