पूर अन् अतिवृष्टीमुळे 14 कोटी 28 लाखांचे नुकसान

नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यात
पूर अन् अतिवृष्टीमुळे 14 कोटी 28 लाखांचे नुकसान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 30 आणि 31 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूरामुळे (Flood) चार तालुक्यात 14 कोटी 28 लाखांचे नुकसान (Loss) झालेले आहे. यात शेतातील पिकांचे (Crops) 11 कोटींचे तर शेतजमीन वाहून गेल्याने अथवा गाळ साचल्याने 1 कोटी 11 लाखांचे नुकसान झाले आहे. 85 लाखांचे पशुधन वाहून गेले असून 70 लाखांचे कच्ची आणि पक्क्या घरांचे नुकसान (Home Loss) झाले आहे. पुराच्या पाण्यात (Flood Water)नागरिकांचे 88 लाखांचे कापडे अन् भांडीकुंडी वाहून गेली आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.

जिल्ह्यात 30 आणि 31 तारखेला झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरामुळे (Flood) शेवगाव (Shevgav), पाथर्डी (Pathardi), नेवासा (Newasa) आणि नगर तालुक्यात शेती, शेत जमीन, पशुधन, घरांचे, घरातील साहित्यांचे नुकसान झालेले आहे. याबाबतचे पंचनामे अंतिम झाले असून विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविण्यात आलेला आहे. या अहवालात शेतीचे 33 टक्क्यांच्यावर नुकसान (Loss) झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगर (Nagar), पाथर्डी (Pathardi) आणि शेवगाव (Shevgav) या तीन तालुक्यातील 106 गावांतील 20 हजार 766 शेतकरी बाधित झालेले आहेत. त्यांचे 12 हजार 455 हेक्टरवरील पिकांचे (Crops) 8 कोटी 46 लाखांचे नुकसान झालेले आहे. तसेच एक हजार 506 हेक्टरवरील फळपिके सोडून बागायत पिकांचे नुकसान झाले असून त्याची रक्कम 2 कोटी 3 लाख आहे. तसेच 130 हेक्टरवरील फळपिकांचे 23 लाखांचे नुकसान झाले आहे. या तीन तालुक्यांत एकूण 14 हजार 92 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झालेले असून त्याची नुकसान झालेली रक्कम 10 कोटी 73 लाख एवढी आहे.

अतिवृष्टीमुळे शेत जमीन वाहून जाणे, शेतजमिनीवर 3 इंचापेक्षा अधिक गाळ साचणे यामुळे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील 44 गावांतील 805 शेतकर्‍यांचे 1 कोटी 11 लाखांचे नुकसान झालेले आहे. यासह शेवगाव तालुक्यातील एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याच्या वारसांना चार लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात 871 पशूधन वाहून गेल्याने 85 लाख 29 हजारांचे नुकसान झालेले आहेत. यात 192 मोठी दुधाळ जनावरे, 648 लहान छोटी दुधाळ जनावरे, 29 मोठी ओढकाम करणारी जनावरे आणि दोन लहान ओढकाम करणार्‍या जनावरांचा समावेश आहे. 940 शेतकर्‍यांच्या पशूधनाला पूराचा फटका बसला आहे. तसेच 68 हजार रूपयांच्या 1 हजार 370 कोंबड्या मरण पावल्या आहे.

शेवगाव तालुक्यातील 913 व पाथर्डी तालुक्यातील 856 कुटूंबाचे कपडे आणि घरगुती भांडे वाहून गेल्याने 87 लाखांचे नुकसान झालेले आहे. पाथर्डीत 12 कच्च्या घरांचे 11 लाख, शेवगाव तालुक्यात 33 पक्क्या घरांचे 31 लाख 38 हजारांचे नुकसान झालेले आहे. घरांचे 15 टक्के झालेल्या नुकसानीत नगर तालुक्यात 7 घरांचे 42 हजारांचे, नेवासा तालुक्यात 3 घरांचे 18 हजारांचे, पाथर्डी तालुक्यात 347 घरांचे 20 लाख 82 हजारांचे तर शेवगाव तालुक्यात 70 कच्च्या आणि 40 पक्क्या घरांचे नुकसान झालेले आहे. यासाठी 6 लाख 6 हजारांचे अनुदान आवश्यक आहे. पाथर्डी तालुक्यात 32 गोठ्यांचे नुकसान झाले असून यात 67 हजारांचे नुकसान झालेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com