अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राच्या नियमापेक्षा भरीव मदत

राज्यमंत्री तनपुरे : पालकमंत्र्यांचे प्रशासन गतिमान असल्याचा दावा
अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राच्या नियमापेक्षा भरीव मदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी (Pathardi), शेवगाव (Shevgav), नगरच्या अतिवृष्टीग्रस्त (Heavy rain) शेतकर्‍यांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनापेक्षा भरीव मदतीसाठी राज्य सरकार (State Government) प्रयत्नशील आहे, असे ग्रामविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Rural Development and Energy Prajakt Tanpure) यांनी केला. संकटग्रस्तांच्या मदतीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांच्या नेतृत्वात प्रशासन गतीमान असल्याचा दावा त्यांनी केला.

अतिवृष्टीग्रस्त (Heavy rain) तालुक्यातील नुकसान आढावा बैठक (Damage review meeting) सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale), शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले (Shevgaon Panchayat Samiti Speaker Kshitij Ghule) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ना.तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांचा नुकताच दौरा केला. या दौर्‍यानंतर तातडीने मदतीच्या सुचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार तातडीने धान्यमदत करण्यात आली.

महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मदतीसाठी 15 हजार शेतकर्‍यांचे तातडीने अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यांंना भरीव मदतनिधीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे ना.तनपुरे (Minister of State for Rural Development and Energy Prajakt Tanpure) यांनी केला. संकटग्रस्तांच्या मदतीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री प्रशासनाच्या संपर्कात असून या आठवड्यात ते जिल्हा दौरा करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप सरकारमुळे समस्या

राज्यात भाजप सरकार असताना अनेक समस्या निर्माण करून ठेवण्यात आल्याने वीजनिर्मितीसह अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागत आहेत. चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातील निधी महावितरणकडे वळता करण्यात आला. त्यात प्रशासकीय घोळ करण्यात आले. सध्या करोनासंकटामुळे महावितरणला वसुलीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, असे उर्जा राज्यमंत्री म्हणाले. नगर जिल्ह्यात 10 सबस्टेशनसाठी कार्यारंभ आदेश लवकरच निघतील, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com