श्रीगोंदा नगराध्यक्षांविरोधातील अपिलावर आज सुनावणी

मंत्री तनपुरे यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष
श्रीगोंदा नगराध्यक्षांविरोधातील अपिलावर आज सुनावणी

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे व काँग्रेसचे गटनेते मनोहर पोटे यांना अपात्र ठरवावे यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व सतीश बोरुडे यांनी केलेल्या अपिलावर नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मंगळवारी (दि.26) सुनावणी होणार आहे. तनपुरे काय निर्णय घेतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पोटे दाम्पंत्य हे श्रीगोंदा नगरपालिकेत काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करत बबनराव पाचपुते यांचा प्रचार केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे काम सुरु केले आहे. वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे पोटे दाम्पत्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अन्हर्ता अधिनियम 1986 च्या कलम (3) (1) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे आणि अहर्तेच्या तारखेपासून सहा वर्षापर्यंत त्यांना अध्यक्ष तसेच नगरसेवक राहण्यास व होण्यास अपात्र ठरवावे अशी मागणे अपिलाद्वारे केली आहे.

याबातचा पहिला अर्ज भोस व बोरूडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केलेला होता. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे 7 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेबाबतचा अर्ज फेटाळला होता. म्हणून त्यांनी नगर विकास खात्याचे राज्यमंत्री यांचेकडे 9 नोव्हेंबर 2020 रोजी अपील दाखल केले होते. मात्र आतापर्यंत नगरविकास मंत्र्यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली नव्हती. अखेर तनपुरे यांच्या राहुरी येतील निवासस्थाना समोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. दरम्यान तनपुरे यांच्या कार्यलयाने 26 एप्रिल रोजी मंत्रालयात सुनावणी घेत असल्याचे पत्र भोस-बोरुडे यांना पाठवले आहे.

पक्षांतर बंदी कायद्याने अपात्र ठरवावे

नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक पंजा चिन्हावर लढून पोटे पती-पत्नी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप मध्ये प्रवेश केल्याचे सर्व पुरावे आहेत. तसेच पुन्हा महा विकास आघाडी स्थापन झाल्यावर पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना ते पक्षांतर बंदी कायदा नुसार अपात्र करावे असे टिळक भोस आणि सतिष बोरुडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.