अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने मंजूर केलेल्या स्टॅडिंग वॉरंटला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.

त्यावर गुरूवारी सुनावणी घेण्यात आली असून दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून सोमवारी (दि. 22) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार असून त्याला जिल्हा न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाने जामीन नामंजूर केला आहे. बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीस आणि स्टॅडिंग वॉरंटला पारनेर न्यायालयातून मंजूरी घेतली आहे. त्या स्टॅडिंग वॉरंटलाच बोठे याच्याकडून जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.

या अर्जावर गुरूवारी न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सरकारी पक्षाकडून वकील ढगे यांनी बाजू मांडली. तर आरोपीच्या वतीने अॅड. म्हसे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला असून यावर आता सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.