आरोग्य कर्मचार्‍याचा दारू पिवून धिंगाणा

आरोग्य कर्मचार्‍याचा दारू पिवून धिंगाणा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला दारू पिलेल्या आरोग्य कर्मचार्‍याने शिवीगाळ करत दमदाटी केली.

या तळीराम कर्मचार्‍याला खुद्द पोलिसांनी समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंगात दारूचा संचार असल्याने पोलिसांनाही या बहाद्दराने दाद दिली नाही. शेवटी पोलिसांनी गाडीत टाकून नेत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल केला.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी घडली. आरोग्य केंद्रातील सतिश म्हस्के असे या मद्यपी कर्मचार्‍याचे नाव आहे. बुधवारी वारीतील भरत गंगाधर वाघ करोना प्रतीबंक लस घेण्यासाठी वारी प्राथमिक आरोग्य केद्रात आले होते. लसी संदर्भातील नोंदणीचे काम आरोग्यसेवक सतीश म्हस्के यांच्याकडे आहे.

वाघ यांनी लसीसंदर्भात म्हस्के यांच्याकडे चौकशी केली. त्यावर म्हस्के यांनी वाघ यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावर इतर ग्रामस्थांनी म्हस्के यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. दारू पिलेले असल्याने त्यांचा धिंगाणा सुरूच होता. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावर पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे फौज फाट्यासह वारी केंद्रात दाखल झाले. त्यांच्यासह इतरही पोलीस कर्मचार्‍यांनी मद्यपी आरोग्य कर्मचारी यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही एक एकले नाही. शेवटी या कर्मचार्‍यास कोपरगाव येथे नेऊन त्याची आरोग्य तपासणी केली. त्यात कर्मचारी दारू पिलेला असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी सतीश म्हस्के याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com