आरोग्य भरतीचे नव्याने येणार सुधारित वेळापत्रक

नगर जिल्हा परिषदेत साडेपाचशे जागा : दोन वर्षांपासून उमेदवार प्रतिक्षेत
आरोग्य भरतीचे नव्याने येणार सुधारित वेळापत्रक
झेडपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुढील महिन्यांत होणारी आरोग्य भरती ( Health Recruitment) राज्य शासनाकडून (State Government) अचानक स्थगित (Postponed) करत नव्याने सुधरित वेळापत्रक काढून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला (Zilla Parishad Health Department) कळविले आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साडेपाचशे जागांची भरती होणार आहे. मात्र, भरती स्थगित झाल्याने दोन वर्षापासून ताटकाळलेल्या उमेदवारांना पुन्हा नवीन सुधारित वेळापत्रकाची (New revised schedule) वाट पाहावी लागणार आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर तोकडी पडणारी आरोग्य यंत्रणा सक्ष्म करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात साडेआठ हजार आरोग्य कर्मचार्‍यांच्या जागा भरण्याचे नुकतेच जाहीर केले होते. यासाठी नवीन अर्ज मागवण्यात येणार नसून मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यावेळी 18 संवर्गाच्या जागा होत्या. आता तूर्तास केवळ आरोग्य विभागाच्या पाच संवर्गासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना 14 जून रोजी ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.

त्यानुसार आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांच्या भरतीसाठी 7 आणि 8 ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु जूनअखेर पुन्हा आदेश काढून शासनाने ही भरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहे. भरतीबाबत नव्याने वेळापत्रक काढण्यात येणार असून त्यानंतर भरती प्रक्रिया होणार असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांकडून सांगण्यात आले. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 13 औषधनिर्माता, 3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 206 आरोग्यसेवक (पुरूष) व 352 आरोग्यसेवक (महिला) अशा सुमारे साडेपाचशेहून अधिक जागा भरायच्या आहेत. परंतु भरतीबाबत पुढील आदेश येत नसल्याने आधीच दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या या उमेदवारांची प्रतिक्षा आणखी वाढली आहे.

अपंग आणि एसबीसींना देता येणार विकल्प

2019 च्या भरतीमध्ये अपंगाना 3 टक्के जागा राखीव होत्या. परंतु या जागा वाढवून मिळाव्यात म्हणून न्याप्रविष्ठ झालेल्या या प्रकरणात पुढे न्यायालयाने 4 टक्के जागांचा समावेश करण्याचा आदेश दिल्याने आता 4 टक्केप्रमाणे अपंगाची भरती होणार आहे. या उमदेवारांसह आर्थिकदृष्ट्या मागास (एसबीसी यांना) खुल्या अर्ज भरण्यास विकल्प देता येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com