आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक- डॉ. बडाख

आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक- डॉ. बडाख

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिवन जगताना संतुलित आहार व योग्य जिवनशैलीप्रमाणे जगल्यास आरोग्याचा समस्या कधीच उद्भवणार नाहीत, असे प्रतिपादन आहारतज्ञ डॉ. विद्या बडाख यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ श्रीरामपूर आणि निर्मि इन्स्टिटयुट यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव डावखर कन्या विद्यालयात शालेय मुलींचे आरोग्य व आहार या विषयावरमार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी डॉ. बडाख बोलत होत्या. यावेळी रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर पाटील, सचिव अभिजित मुळे, खजिनदार विनोद पाटणी, तसेच निर्मि इन्स्टिटयुटच्या सचिव निशा निर्मळ, तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना बनकर पाटील, मुख्याध्यापिका रेखा कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

डॉ. विद्या बडाख यांनी उपस्थित 200 मुलींना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत समाधानकारक मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. बनकर यांनी, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेच विविध उपक्रम वर्षभर राबवू, असे सांगत रोटरी क्लब शहरात 45 वर्षांपासून अविरत सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.

मुख्याध्यापिका रेखा कुलकर्णी यांनी, रोटरी क्लबने असेच शैक्षणिक उपक्रम या संस्थेत राबवावे, असे आवाहन केले. निर्मि इन्स्टिटयुटच्या सचिव निशा निर्मळ यांनी त्यांच्या इन्स्टिटयुटच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमानंतर 200 विद्यार्थिनींना आरोग्यविषयक किटचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेश वारुळे यांनी केले तर रोटरीचे सचिव अभिजित मुळे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com