नदी काठावरील 223 गावच्या ‘आरोग्य’ साठी ‘आपत्ती जोखीम’ सज्ज !

झेडपी : पूर परिस्थितीत साथरोग रोखण्याचे आवाहन
नदी काठावरील 223 गावच्या ‘आरोग्य’ साठी ‘आपत्ती जोखीम’ सज्ज !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Zilla Parishad) आपत्ती जोखीम व्यवस्थापनांतर्गत (Disaster risk management) जिल्ह्यातील 223 नदीकाठवरील गावात (Riverside Village) संभाव्या पूर परिस्थितीत साथरोगाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी आराखडा तयार (Prepare the layout) केला आहे. त्यानूसार या गावात पावसाळ्या पूर परिस्थिती झाल्यास आरोग्याच्या तातडीच्या सुविधा (Emergency health facilities) पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात नदी काठावर राहुरी (Rahuri) तालुक्यात 39, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात 27, नेवासा (Newasa) तालुक्यात 26, अकोले (Akole) तालुक्यात 24, कर्जत (Karjat) तालुक्यात 22, कोपरगाव (Kopargav) तालुक्यात 21, संगमनेर (Sangmner) तालुक्यात 17 गावे आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत नदीकाठच्या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव वाढतो. जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणार्‍या गावांमध्ये 223 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या करोना संसर्गासोबतच पावसाळ्यात या गावांमध्ये पूर (Flood) येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Zilla Parishad) आपत्ती जोखीम व्यवस्थापनांतर्गत नदीकाठच्या गावांची पाहणी केली आहे. या गावांमध्ये जास्त पाऊस झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यास या गावांमध्ये उपाययोजना करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

गावात पूर आल्यास साथरोग उद्भवण्याचा धोका आधिक असतो. त्यामुळे या दृष्टीनेही नियोजन केले आहे. तसेच, पुराची (Flood) परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले आहे. गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांतील आरोग्य अधिकार्‍यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, अशा गावांना जोखीमग्रस्त गावांच्या यादीत टाकण्यात आले असून पावसाळ्याच्या काळात या गावांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात अधिकार्‍यांना जबाबदारी निश्‍चित करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात सातत्याने साथरोगांचा उद्रेक होणार्‍या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावात साथरोग उद्भवू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. वैद्यकिय अधिकार्‍यांची पथके तयार केली आहेत. आरोग्य केंद्रात पुरेसा औषधांचा साठा ठेवण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या यात्रा ठिकाणांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

अकोले-भंडारदार, शेंडी, रुभोडी, इंदोरी, सावंतवाडी, म्हाळादेवी, उंचखडक बु, उंचखडक खु, टाकळी, अकोले, सुगाव बु, सुगाव खु, कुंभेफळ, माळेगाव, कोंदणी, शेलविहार, दिंगबर, चितळवेढे, निभ्रळ, निळवंडे, विठा, मेंहदुरी. संगमनेर- जोर्वे, आश्‍वी खु, कनकापूर, कनोली, दाढ बु, कळस बु, कळस खु, धांदरफळ खु, धांदरफळ बु, रायते, खराडी, वाघा, वेळापुर, संगमनेर. अजनुज, कौठे, निमगाव खलु, गार, हंगेवाडी वस्त्या, सडगाव, राजापूर, मुगहापुर, कासार दुमला. राहाता- दाढ बु, हनुमंत गाव, पाथरे बु, कोल्हार, काडीत बु. श्रगोंदा- काष्टी, सांगवी दु, बोरी, हंगेवाडी, वांगदरी, आर्वी, पांगदरी वस्त्या, पेडगाव. श्रीरामपूर- कडित खु, मांडवे, कुन्हाणपूर, फत्याबाद, गळनिंब, उक्कडगाव, एकलहरे, बेलापूर, कान्हेगाव, पढेगाव, लाडगाव, चंद्रापूर, मालुुंजे, नरसाळी, अनगर, पाचपुते वस्ती, सरला, गोवर्धन, महांकाळवडगाव, नाहुरी, रामपुर, जाफराबाद, नायगाव, मातुळठाण, भामाठाण, खानापूर, कमलापूर, खिर्डी, वांगी खु आणि बु. राहुरी- गंगापूर, पिंपळगाव, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, लाख, मालुंजे खु, महलगाव, खुडसगाव, पाथ्री, कोपरे, धानोे, सोनेगाव, सात्रळ, रामपुर, कोल्हार, चिंचोडी, दवणगाव, आंबी, अंमळनेर, केसापूर, संक्रापूर, तिळापूर, सेलवडगाव, माहेगाव, तांदुळवाडी, वालन, आरडगाव, मानोरी, मांजरी, वांभुजपोई, चनकापूर, पिंप्री, कोंढवड, बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी बु, देसवंडी. नेवासा- पाचेगाव, पुतनगाव, सुरेगाव, घोगरगाव, जैनपूर, सुरेगाव, बेलपांढरी, नेवासा खु. खलालपिंप्री, मुरमे, प्रवरासंगम, खंडले बु, शिलेगाव, खेडले परमानंद, करजगाव, पानेगाव, खेडले खु. कर्जत- निमगाव गांगर्डा, उंबरी, रातनजन, तिखी, नागलवाडी, बहिरवाडी, गोधेगाव, गोणेगाव, अंबळनेर, इमामपूर, धामोरी, चिंचबन, अंबळनेर, निंभारी, तारडगाव, मलठाण, नागापूर, निंबोडी, चिंचपूर, जलालपूर, सिध्दटेक, देऊळगाववाडी, देरडी, दुधोडी, अंभोरा, हिंगणगाव, गणेशवाडी, खेड, औटेवाडी, शिंपोरा, बाभुळगाव. जामखेड- कौडगाव, चोंडी, अधी.कोपरगाव- मोरवी, चास, मंजुर, डाऊच बु, कोकमठाण, डाऊच खु, संवत्सर, जेऊर कुंभारी, मायगाव देवी, मालेगावथडी, पुणतांबा. शेवगाव- मुंगी. पारनेर- रेणवडी, चोभुंत, शिरापूर, वडनेर, ढवणवाडी, वेळापुर, सांगवी भुसार, सुरेगाव, कोळगाव थडी, मळेगाव, कुंभारी, धरणगाव, हिंगणी, मुर्शदपुर, चांदगव्हाण, गुणवडी, म्हसे खु, कुरूंद, मांडवे, देसवडे, तास, वडनेर खु., वांगी, शिंपोरा. नगर- जेऊर, वडगाव गुप्ता, नेप्ती, बुरूडगाव, शिराढोण, साकत, वाटेफळ, वांळुज, रुईछत्तीशी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com