पहिल्या पत्नीला फसवून ‘त्या’ पठ्ठ्याने केले दोन लग्न

सहाजणांवर गुन्हा दाखल; राहुरी तालुक्यातील घटना
पहिल्या पत्नीला फसवून ‘त्या’ पठ्ठ्याने केले दोन लग्न

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पत्नीला फसवून पतीने आणखी दोन लग्न केले. (The husband cheated on his wife and married two more) तसेच घर बांधण्यासाठी पहिल्या पत्नीने (Wife) माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. ही घटना राहुरी (Rahuri) तालुक्यातील निंभेरे (Nimbhere) येथे घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता विजय नागरे (वय 24 वर्षे, रा. निंभेरे ता. राहुरी) हिने राहुरी पोलिसांत (Rahuri Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, ऑगस्ट 2013 मध्ये सविता गागरे हिचा विवाह विजय नागरे (Vijay Nagare) याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिला व्यवस्थित नांदविले.

त्यांना वैष्णवी नावाची अडीच वर्षाची एक मुलगी आहे. सन 2015 मध्ये सविता हिचे सासू, सासरे व पती हे तिला म्हणाले, आपल्याला गायांचा धंदा करायचा आहे. त्यासाठी तू तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आण. तेव्हा सविता हिने माहेरहून दोन लाख रुपये आणून दिले. काही दिवसांनी परत गाडी घ्यायची म्हणून एक लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. एक लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत, म्हणून सविता हिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला.

दरम्यान, सविता हिला फसवून तिचा पती विजय याने शेवगाव (Shevgav) येथील व त्यानंतर संगमनेर (Sangamner) येथील अशा दोन तरुणींसोबत लग्न केले. नंतर सविता हिने घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा सासरच्या लोकांकडून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला.

याप्रकरणी सविता विजय नागरे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय उर्फ गणेश विठ्ठल नागरे, सखूबाई विठ्ठल नागरे, विठ्ठल कारभारी नागरे, सोनल गणेश शेळके, गणेश विठ्ठल शेळके, गणेश भाउसाहेब सांगळे सर्व रा. निंभेरे ता. राहुरी, या सहा जणांवर फसवणूक व पैशासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com