संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय मुलीवर सामुदायीक अत्याचार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ

संगमनेर तालुक्यातील सर्व मागासवर्गीय संघटनांच्यावतीने काल बसस्थानक येथील नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस या गावातील मागासवर्गीय मुलीवर सवर्ण समाजातील चौघा नराधमींनी सामुहीक अत्याचार केला. आरोपींचा शोध लागू नये म्हणून तिची हत्या करण्यात आली. सदर गुन्ह्यांची चर्चा होवू नये म्हणून मिडीयाला देखील मॅनेज करण्यात आले.

अत्याचारीत मुलगीवर उपचार चालू असतांना तिच्या कुटूबियांना पोलिसांनी ताब्यात घेवून नजरकैदेत ठेवले होते. अत्याचारीत मुलीच्या घरासमोर सुमारे 200 पोलिसांचा बंदोबस्त लावून परिसराला छावणीचे स्वरुप दिले होते. पोलिसांनी अर्ध्या रात्री अत्याचारीत मुलीवर अंत्यसंस्कार करुन घेतले. उत्तर प्रदेशातील पोलीस यंत्रणा ही दलालांच्या भुमिकेत दिसत आहे. या सर्व घटनेचा आम्ही निषेध करत आहोत.

अत्याचारीत मुलीला न्याय मिळावा यासाठी फार्स्ट ट्रॅक कोर्टातून ही केस चालविण्यात यावी, आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी तसेच जबाबदारी पोलीस अधिकार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, भारतातील सर्व मागासवर्गीय महिला व मुलींना अॅट्रोसिटी कायद्यानुसार स्व रक्षणासाठी बंदूक द्यावी.

अशा मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. निवेदनावर मंजाबापू साळवे, राजेंद्र खरात, प्रविण गायकवाड, रविंद्र गिरी, राजेंद्र वाकचौरे, कारभारी देव्हारे, संतोष जेधे, सुनिल जाधव, अकिलखान पठाण, विनोद गायकवाड, सुधाकर रोहम, अशोक गायकवाड, शरद जमधडे, रामदास सुराळकर, विजय पांढरे, कैलास कासार, योगेश सुर्यवंशी, रमेश रुपवते, प्रशांत घेगडमल, सचिन साळवे, बंटी यादव, देवेंद्र काळे, संतोष पुड, प्रकाश वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोसल डिस्टन ठेवून नागरीक रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते. रास्तारोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरीक सहभागी झाले होते. सुमारे एक तास रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर रास्तारोको बंद करण्यात आला.