झेडपी अध्यक्षांनी आणलेल्या निधीचा विकास केवळ कागदावरच

शहरटाकळीच्या संवाद यात्रेत हर्षदा काकडे यांची बोचरी टीका
झेडपी अध्यक्षांनी आणलेल्या निधीचा विकास केवळ कागदावरच

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

जिल्हा परिषद अध्यक्षांनी दहिगाव गटामध्ये निधी तर भरपूर आणला. परंतु, त्यांनी काम करण्याऐवजी फक्त ठेेकेदार निर्माण केले. गटातील विकास हा फक्त कागदावरच असल्याची बोचरी टीका जनशक्तीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी शहरटाकळी येथे केले.

तालुक्यातील शहरटाकळी येथील जनशक्तीच्या संवाद यात्रा नूतन शाखा उद्घाटन प्रसंगी काकडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनशक्तीचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजीराव काकडे होते, तर कार्यक्रमासाठी राजू पातकळ, अ‍ॅड. भाऊसाहेब मराठे, आबासाहेब राऊत, अशोक ढाकणे, लक्ष्मण पातकळ, लक्ष्मण घोंगडे, भागचंद कुंडकर, सूर्यकांत गवळी, शामराव खरात, बाळासाहेब नरके, अकबर शेख, शिवाजी आजबे, ज्ञानदेव मगर, डॉ.बापुसाहेब गादे, रामचंद्र गिरम आदी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब राजळे, राजेंद्र दामोदर चव्हाण, कडुबाळ घुले, गोविंद काळे, ज्ञानदेव खराडे, शिवनाथ बोरुडे, राजेंद्र गवळी, सुभाष कांबळे, यांनी जनशक्ती विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी काकडे म्हणाल्या, तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले, तेव्हा वाटले खूप विकास कामे तालुक्यात होतील. परंतु झाले उलटेच. अध्यक्षांनी त्यांनी सर्व कामे एकट्या दहिगाव गटात आणून गल्लोगल्ली ठेकेदार तयार केले व तालुक्यातील इतर गट वार्‍यावर सोडून दिले. लाडजळगाव गटातील विकास कामे मुद्दामून कट केली. गोरगरिबांसाठी खूप कामे त्यांना करता आली असती परंतु अध्यक्षांनी नेहमीच विकास कामात खोडा घालण्याचे काम केले. आता जनता तुम्हाला माफ करणार नाही.

शेतकर्‍यांच्या ऊस तोडीला एकरी 10 हजार खर्चही यांच्या नियोजनामुळेच आला. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवा. यांच्या घरात प्रत्येकाला पद पाहिजे पण आता एखाद्या गरीब माणसाला आम्ही सभापती करू शकतो फक्त तुमची साथ आम्हाला द्या. तालुक्यात तिसरा पर्याय आम्ही देत आहोत अशी साद ही काकडे यांनी मतदारांना घातली. यावेळी अनेक महिला व पुरुष ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक तरसे यांनी तर आभार मनोज घोंगडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com