हरिश्चंद्रगड येथील डोहात बुडून पर्यटकाचा मृत्यू

हरिश्चंद्रगड येथील डोहात बुडून पर्यटकाचा मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर मधुकर दांडाईत (वय-21) या तरुणाचा हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर असणाऱ्या डोहात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील पर्यटक मंगळवारी पर्यटनासाठी हरिश्चंद्रगड परिसरात आले होते. तर हरिश्चंद्रगड चढत असताना गडाचा दुसरा माथा चढून गेल्यावर काही फिरत होते. परंतु गत दोन- तीन दिवसांपूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे डोंगर द-यातील ओढे नाले आजुनही खळखळून वाहत आहेत. तर माथ्यावरील डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ज्ञानेश्वरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मित्रांनी आपल्या गाडीत टाकून राजूर येथे आणले व राजूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. तर पोलीस दप्तरी अकस्मात मु.27/2021 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .हे.कॉ.मुंढे करत आहेत.

Related Stories

No stories found.