प्रशासनाचा आदेश डावलून हरिगाव येथील आठवडे बाजारात मोठी गर्दी

करोना, डेल्टा प्लस व्हेरीयंट प्रादुर्भावाचा धोका
प्रशासनाचा आदेश डावलून हरिगाव 
येथील आठवडे बाजारात मोठी गर्दी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्हाधिकारी (Collector) यांच्या आदेशानुसार (Order) सर्व आठवडे बाजार बंद (Weekly Market Close) केले असताना हरिगावचा रविवारचा आठवडे बाजार अद्याप बंद होताना दिसत नाही. ग्राहक व व्यापारी यांची बाजारात अलोट गर्दी (Market Crowd) असते. स्थानिक करोना दक्षता कमिटी उंदीरगावची येते. इथे बसू नका फक्त सूचना देतात. लगेच बाजार हरिगाव कारखाना हद्दीत भरतो. तेथून हटवले की संत तेरेजा चर्च रोड परिसरात बाजार भरतो. असे चित्र कालच्या रविवारी पहावयास मिळाले.

कोणतेही शासनाचे नियम पाळले जात नाहीत..हरिगाव ग्रामपंचायत (Harigav Grampanchayat) ग्रामसेवक बाजारकरूना सूचना द्यायला गेल्यावर त्यांनाच दमदाटी करण्यात आली. महिलांना पुढे करायचे व वाद करायचा, असे प्रकार घडतात. त्यातून मारामार्‍या होण्याची शक्यता असते. नागरिकांनी तक्रारी केल्याप्रमाणे तालुका पोलीस अधिकारी कर्मचारी आले. सूचना दिल्या. तात्पुरते ऐकतात.पोलीस गेले की परत जैसे थे, नागरिक व बाजारकरू करोना प्रादुर्भाव (Corona outbreak), डेल्टा प्लस व्हेरीएंट (Delta Plus variant) या गंभीर आजाराची दक्षता घेत नाहीत.

हरिगावप्रमाणे शिरसगावचा आठवडे बाजार (Shirasgav Weekly Market) आता महिन्या दोन महिन्यापासून श्रीरामपूर शहर हद्दीत कृष्णा हॉस्पिटलसमोर पहिल्यापेक्षा दुप्पट गर्दीने (Crowd) भरत आहे. जमावबंदी सोशल डिस्टसन्ससिंग (Social Distance) वगैरे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. या भागातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी करुनही नगरपालिका, पोलीस, आरोग्य विभाग (Health Department) व प्रशासनाने गांभीर्याने पहिले नाही. हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने रस्ता सोडून मोकळ्या जागेत बसण्याच्या सूचना द्याव्यात. दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाने कारवाई करावी. यासाठी प्रभाग 4 मधील नागरिक श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक (Anuradha Adik), पोलीस निरीक्षक संजय सानप (PI Sanjay Sanap) व आरोग्य विभाग अधिकारी यांना भेटणार आहेत. बाजार भरल्यास करोनाची चाचणी (Corona Testing) घेऊनच बाजारात बसण्यास परवानगी द्यावी. त्या ठिकाणी पथक पाठवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com