हरेगाव फाट्यावरील पोलीस निवारा कक्षासमोर दोन वाहनांचा अपघात

हरेगाव फाट्यावरील पोलीस निवारा कक्षासमोर दोन वाहनांचा अपघात

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा या ठिकाणी कार व ट्रक या दोन वाहनांचा अपघात होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतुकीला काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.

अशोकनगर येथील माल ट्रक (क्र. एम एच 21 डी 9799) पेट्रोल पंपावरून डिझेल भरून श्रीरामपूरच्या दिशेने जात असताना हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष याठिकाणी औरंगाबादवरून येणारी का (क्र. एम एच 20 ई वाय 1478) यांना समोरील वाहनाने हुल मारल्याने वाहनचालक फिरोज खान यांनी जागेवर ब्रेक मारला. यामुळे पाठीमागे असलेली ट्रक जोरात समोरच्या कारवर आदळली. यामुळे कारचे पाठीमागील बाजू मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अपघात घडताच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यावेळी येथील पोलीस निवारा कक्ष येथील पोलीस नाईक प्रशांत बारसे यांनी दोन्ही वाहनचालक व मालक यांना समजावत वाहतूक सुरळीत केली. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावर गतिरोधकासंदर्भात वारंवार लेखी व तोंडी माहिती देऊनही संबंधित विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.

यावेळी गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, निपाणी वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवार, सुहास राठोड, अमोळ घाळ, गणेश गायकवाड यांनी वाहतूक सुरळीत करत दोन्हीही वाहनचालक व मालक यांना वैद्यकीय उपचार करण्याकरिता तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर प्रक्रिया दाखल करण्याकरिता नेण्यात आले. संबंधित रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी सरपंच आबासाहेब गवारे, राजेंद्र गवारे, अण्णासाहेब गवारे यांनी अनेकदा केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com