हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात

हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला यामध्ये हरेगाव कडे जाणाऱ्या कमानी पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलसमोर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये माळेवाडी येथील गणेश संजय खिलारी सदर तरुण हा माळेवाडी कडे जात असताना उंदीरगाव येथील दिलावर भाई यांची जोरदार धडक झाली.

यामध्ये दोघांच्याही दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दिलावर भाई यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तसेच गणेश खिलारी यांना तोंडाला तसेच डोक्याला जबर मार लागला आहे. खिलारी यांचे वाहन हिरो स्प्लेंडर एम एच 17 ए डब्ल्यू 394 असून दिलावर भाई यांचे वाहन फोर एस एम एच 17 डी 654 आहे या रस्त्यावर काही दिवसापूर्वी खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. परंतु रस्त्यावर जास्तीत जास्त कचकडी आढळून येत असल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

यामुळे परिसरात वारंवार खड्ड्यांमुळे तसेच बुजवलेल्या खड्यावर डांबर कमी खड्डे जास्त असल्याने अपघात होत असतात यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी देण्यात आली यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सांगळे गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई पोलीस मित्र आसिफ सय्यद शरद दिवटे गणेश गायकवाड अमोल घाळ शुभम सपकाळ यांनी घटनास्थळी भेट देत.

परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यावेळी दिलावर भाई यांच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय सूत्राकडून त्यांना मयत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com