हरेगाव-खैरी निमगाव रस्त्याचे खड्ड्यांमुळे वाजले तीनतेरा

File Photo
File Photo

हरेगाव |वार्ताहर| Haregav

हरेगाव- खैरी निमगाव रस्ता अत्यंत खराब झाला असून खड्ड्यांमुळे या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे.

हरेगाव- खैरी निमगाव हा रस्ता पाच किंमी. अंतराचा असून सिमेंट काँक्रीटचा आहे. हा रस्ता कित्येक वर्षाचा जुना आहे. परंतू त्याची आतापर्यंतच काय पण गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत भयानकपणे नादुरुस्ती झाली आहे. या रस्त्याने वाहनांनाच काय णपायी चालणे देखील मुश्किल झाले आहे.

हरेगावहून रस्त्यावरील ए ब्लॉक वाडीपर्यंत मोठ्या मुश्किलीने पायी जाऊ शकतो. हरेगाव ते ए ब्लॉक वाडीपर्यंत पायी जाण्यासाठी किमान एक तास तरी लागतो. हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत गुंतागुंतीचा झाला असून अनेक वस्त्या आहेत, तेथे किमान 400 ते 500 लोकांची वस्ती आहे. कसेतरी लोक या रस्त्याने ये-जा करतात. कारण हा एवढा रस्तादेखील खोल-खोल झालेला आहे.

तसेच ए ब्लॅाक वाडी पासून निमगाव खैरीपर्यंत वाहनाने जाण्यासाठीचा काय पण पायी जाणे देखील अत्यंत वाईट झालेला आहे. या रस्त्यात 2-2 ते 4-4 फूट खड्डे झालेले आहेत. त्यात साचलेले पाणी महिना-महिना कमी होत नाही. संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही. या रस्त्याकडे संबंधितांनी त्वरीत लक्ष देऊन या रस्त्याची योग्य ती व्यवस्था करावी, नसता जनता काय करील, त्यास संबंधितच कारणीभूत राहतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com