हनुमंतगाव शिवारात आढळला मृत बिबट्या

हनुमंतगाव शिवारात आढळला मृत बिबट्या
संग्रहित छायाचित्र

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता (Rahata) तालुक्यातील हनुमंतगाव (Hanumantgav) शिवारात राजेंद्र शिवाजी घोलप यांचे गट नंबर 254 मध्ये उसाचे शेतात (Sugar Cane Farme) मृत बिबट्या (Death Leopard) आढळून आला. हनुमंतगाव परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मागील आठवड्यातच रस्ता पार करताना एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

आता मृत झालेला बिबट्या नर असून अंदाज वय 4 वर्ष असावे असा अंदाज आहे. मृत बिबट्याचा (Death Leopard) शेवट दोन बिबट्यांच्या झुंजीमध्ये झाला असून सत्तेसाठी किंवा अन्नासाठी ही लढाई झाली असावी, असे वन विभागाने (Forest Department) सांगितले. मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी केली.

याप्रसंगी पंच म्हणून अशोक घोलप, प्रवीण विखे, राजेंद्र घोलप, सिद्धीकेश घोलप, प्रवीण ब्राह्मणे, वन्य प्राणीमित्र विकास म्हस्के पंच म्हणून हजर होते. सदर बिबट्याचा दफनविधी वनविभागचे सुराशे यांच्या उपस्थितीत राजेंद्र घोलप यांच्या शेतात करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com