अखेर हनुमंतगावात ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार

अखेर हनुमंतगावात ग्रामस्थांनी केले अंत्यसंस्कार

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील नागरिक भाऊसाहेब पिंपळे यांचे अचानक निधन झाले. करोनाच्या भितीमुळे अंत्यसंस्कार करण्यास भाग घेण्यासाठी नातेवाईक व भाऊबंद घाबरू लागले.

शेवटी सामाजिक कार्यकर्ते अशोक घोलप, ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. वर्पे, आरोग्य अधिकारी डॉॅ. विनायक अवसरकर, ग्रामपंचायत कर्मचारी गौरव गावडे, कैलास अनाप, सतीश प्रधान यांनी एकत्र येत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी मृत व्यक्तीचे मुलगा, मुली, जावई उपस्थित होते. माणुसकी अजूनही जिवंत असल्याची हा पुरावा बघून नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com