हनुमंतगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

हनुमंतगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी केवळ 13 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

हनुमंतगाव सोसायटी व ग्रामपंचायत निवडणुका नेहमीच चुरशीच्या होत असतात. या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी निवडणूकीत विरोधी पक्षाने भाग न घेण्याचे ठरविले असल्याने विखे पाटील परिवारात आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या गटात अंतर्गत चुरस दिसून आली.

सर्वसाधारण कर्जदार खातेदार मतदारसंघातून तात्यासाहेब आप्पासाहेब घोलप, प्रशांत शिवाजी घोलप, विकास ज्ञानदेव घोलप, सतीश सतीश केरूनाथ घोलप, पुंजाराम सदाशिव गावडे, गोकुळ भिमाजी जेजुरकर, किसन केसू अनाप, भागवत गेणूजी कानडे, महिला राखीव मतदार संघातून सौ. वैशाली बाळासाहेब दिघे, सौ. अनिता राजेंद्र घोलप तर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून रावसाहेब राधाकृष्ण अनाप, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भागवत धोंडीबा ब्राम्हणे, भटक्या विमुक्त जाती जमातीमधून अशोक राधाकृष्ण फणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल माघार घेण्याच्या दिवशी शेवटच्या दिवशी एकूण तेरा अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये मतदान अधिकारी म्हणून श्री. सदाफळ व सचिव भाऊसाहेब राऊत यांनी काम पाहिले.

जनसेवा मंडळाचे स्थानिक कार्यकर्ते, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. किसनराव कोतकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या संचालिका सौ. उज्वला अशोक घोलप, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावडे, पोलीस पाटील शोभा अशोक ब्राह्मणे, ग्रामपंचायत सरपंच मनीषा माळी, उपसरपंच प्राजक्ता अनाप, गोरक्ष ब्राम्हणे, मावळते चेअरमन रामनाथ पाबळे यांनी निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून प्रयत्न केले.

नूतन पदाधिकार्‍यांचे आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.