हनुमंतगाव इरिगेशन चारीत मैलामिश्रित पाणी

हनुमंतगाव इरिगेशन चारीत मैलामिश्रित पाणी

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे प्रवरा डावा कालव्याची चारी नंबर 14 ला काळे मैलमिश्रीत पाणी वाहताना दिसत आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या कॅरी बॅग, बाटल्या आदी वस्तू तरंगताना दिसत आहेत. परिणामी प्रदूषण वाढतच आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी वाडीवस्तीकडील आरोग्य सोयीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हनुमंतगावला पाटबंधारे विभागाचे चारी नंबर 14 तून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. दिवसेंदिवस पाणी मागणी कमी झाल्याने शेतकर्‍यांचे पाणीपुरवठा ब्लॉक कॅन्सल झाले. त्यामुळे पाण्याची चोरी थांबली. काळ्या पैशाचा पुरवठा बंद झाला. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पुरेशा कर्मचार्‍यांअभावी चारीच्या रोटेशनकडे दुर्लक्ष करू लागले. झिरो इन्स्पेक्टर म्हणजे स्थानिक पाणी वाटप करणारा नवीन वर्ग तयार झाला. त्यातून मिळणारे उत्पन्न कमी झाले.

त्याचबरोबर चारीच्या बाजूला राहणारे नागरिक सांडपाणी, घरातील उष्टे, खरकटे, प्लास्टिक आदी वस्तू चारीत टाकू लागले. सांडपाणी चारीत सोडल्याने प्रदूषण वाढले. ग्रामपंचायत गावातील गल्लीतून सांडपाण्याचे गटार दरवर्षी नव्याने बांधून, दुरुस्ती करून गाव स्वच्छ करण्याचा फंडा चालू केला. ग्रामपंचायतीचे वाड्या-वस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. परिणामी प्रदूषण वाढतच आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी वाडीवस्ती कडील आरोग्य सोयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com