सततच्या पावसामुळे हनुमंतगाव येथे घर पडले, संसार उघड्यावर

सततच्या पावसामुळे हनुमंतगाव येथे घर पडले, संसार उघड्यावर

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे सतत पडणार्‍या पावसामुळे घराच्या भिंती ओलावल्याने अचानक रात्री छपरासह घर जमीनदोस्त झाले. हनुमंतगावच्या गागरे वस्तीजवळ राहणारे ज्येष्ठ नागरिक सोसायटीचे संचालक किसन केसू अनाप यांचे राहते घर पावसाच्या ओलाव्याने रात्री अचानक पडले.

घरातील वरचा भाग पडल्याने कुटुंब घराबाहेर पडले. काही वेळातच संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. अनाप कुटुंबीय मोठ्या संकटातून वाचले. दिवाळीत घर पडल्याने संसार उघड्यावर पडला आहे. कामगार तलाठी संदीप ठाकरे यांचे सहकारी बाळासाहेब सातपुते, ग्रामपंचायत कर्मचारी गौरव गावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. किसनराव अनाप यांना धीर दिला तसेच सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्याचे रिपोर्ट पाठविण्यात आला आहे, असे कामगार तलाठी श्री. ठाकरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com