हनुमंतगाव, दुर्गापुर, हसनापूर, पाथरे परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के

File Photo
File Photo

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव, पाथरे, दुर्गापुर, हसनापूर या प्रवरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते साडेआठ यादरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नागरिकांनी घराबाहेर येत चिंता व्यक्त केली. निसर्ग पुरेपूर पाठीमागे लागल्याचा दिसून येत आहे. अतिवृष्टीतून शेतकरी सावरत नाही तोच भूकंपाचे धक्क्याने नागरिकांची चिंता वाढविली.

संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान चार ते पाच वेळा भूकंपाचे संमेलन जाणवले. काही ठिकाणी खिडक्यांची तावदाने फुटली. तसेच घरावरील पत्रे, घरातील भांडे भूकंपाच्या कंपनाने हादरली. शेतकर्‍यांनी एकमेकांना प्रत्यक्ष, फोनवरून संपर्क साधत आपल्याकडे असे काही घडले का याची विचारणा केली.

सध्या चोरांची मोठी अवई असल्याने कोणी बरेच दगड वगैरे फेकून पत्र्यावर आवाज केला की काय याची शेतकर्‍यांनी खात्री केली. याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करून नागरिकांना आश्वस्त करावे, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com