हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील हनुमंतगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन रामनाथ पाबळे यांच्या

घासाच्या पिकात मृत बिबट्याचा बछडा आढळून आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळी बाळासाहेब पाबळे यांना बंधू रामनाथ यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यांनी बंधू रामनाथ यांना कल्पना दिली. रामनाथ पाबळे यांनी अशोक घोलप यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के यांना सदर बाबीची कल्पना देऊन वन विभागाच्या कर्मचार्यांना सुचित करण्यास सांगितले .त्याप्रमाणे उपवनसंरक्षक रेड्डी व त्यांचे सहकारी यांनी सदर घटनेची नोंद घेत कोपरगाव वनविभागाचे श्री. सुराशे यांना घटनास्थळी पाठविले त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून अग्नी संस्कार केले .

बिबट्यांची टोळी हनुमंतगाव परिसरात फिरताना दिसत असून या टोळीमध्ये अन्नासाठी किंवा अस्तित्वासाठी झगडा होत असावा. दररोज बिबट्यांच्या भांडणाचा आवाज शेतकर्यांना ऐकू येतो. काल आढळलेला बिबट्याचा नर जातीचा बछडा या वादाचा बळी ठरलेला असावा. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही पिंजरा लावण्याचे वन विभाग टाळीत आहे. लवकरात लवकर या भागात पिंजरा लावावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे.