हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळील जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शनिवार दि. 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान जयंती असून यानिमित्त श्री हनुमान ट्रस्टच्यावतीने पहाटे 4 ते 6 वाजता अभिषेक होणार असून सकाळी 6 ते 6.15 वा. या दरम्यान हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. सायंकाळी 5 ते 5.30 वाजता हनुमान चालिसा होणारआहे. रात्री 8.00 ते 8.30 वाजता श्री महाआरती होणार आहे. पहाटे हनुमान जन्मोत्सवादरम्यान ढोल ताशांच्या गजरात, मंत्रोच्चाराच्या सुरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत हा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावेळी स्व. चंद्रप्रकाश खुशिराम गुप्ता यांच्या प्रेरणेने गेल्या 62 व्या वर्षांपासून सुरु असलेल्या भंडार्‍याचा कार्यक्रम गुप्ता परिवाराच्यावतीने शनिवार दि. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान ट्रस्टच्यावतीने तसेच हनुमान मंदिर सेवेकरी व भाविकांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान मंदिर ट्रस्टचे चेअरमन मणिलाल पोरवाल, खजिनदार सुनील गुप्ता, चंपालाल फोफळे, सुभाष फेगडे, राजेंद डावखर, कल्याण कुंकूलोळ, अरुण गुप्ता, मोहन नारंग, सतीश ताकटे, प्रल्हाद महाराज, आदिनाथ खरात, अगस्ती त्रिभुवन, विष्णू लबडे, महेंद्र नारंग, अनिल छाबडा, पुनित सुनील गुप्ता, प्रथम गुप्ता, शिवनाथ गुप्ता, रमेश निकम, संजय पांडे, गोस्वामी बंगाली, वाल्मिक राऊत, हरि अछडा, गौरव गुप्ता, बंटी गुलाटी, मनोज थापर, श्रीहनुमान मंदिर खिचडी सेवेकरी मंडळ, हनुमान मंदिर भजनी मंडळ, श्री साईसेवक परिवार, हे विशेष परिश्रम घेत आहेत. तरीसर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com