मोटारसायकल झाडावर आदळुन दोघे जागीच ठार

कुठे घडली घटना ?
मोटारसायकल झाडावर आदळुन दोघे जागीच ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा पारनेर रोडवर (Supa Parner Road) हंगा (Hanga) शिवारात आज सायंकाळी मोटारसायकलवरील दोघे झाडावर आदळ्याने (Motorcycle Hit a Tree) जागीच ठार (Death) झाले आहेत.

मोटारसायकल झाडावर आदळुन दोघे जागीच ठार
बारावीच्या निकालात जिल्ह्यात मुलींची बाजी !

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गुरूवार (25 मे) रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान सुपा पारनेर रोडवर (Supa Parner Road) हंगा (Hanga) शिवारातील आमकडा भागात मोटारसायकल (Motorcycle) क्रमांक एमएच 28 एजी 2792 या गाडीवरुन दोन जण पारनेरवरुन सुप्याच्या दिशेने येत होते. हंगा शिवारातील आमकडा भागातील सोंडकर वस्ती जवळील रस्ता वळणाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलस्वराचे (Motorcycle) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडावर जाऊन आदळले. (Hit a Tree) गाडीचा वेग जास्त असल्याने ते रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जाऊन पडले. यात हे दोघेही जबर जखमी होऊन जागीच ठार (Death) झाले आहेत.

मोटारसायकल झाडावर आदळुन दोघे जागीच ठार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची दुटप्पी भूमिका

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी (PI Jyoti Gadakari) यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस (Supa Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही अपघातग्रस्थांना तात्काळ पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे दोघे परप्रांतीय आहे. परंतु अद्याप त्यांची नावे समजु शकले नाही. त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुपा पोलिस करत आहेत.

मोटारसायकल झाडावर आदळुन दोघे जागीच ठार
माजी मुख्यमंत्री रावत यांनी घेतला दक्षिण नगर लोकसभेचा आढावा म्हणाले...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com