तीन हातभट्ट्यांवर एमआयडीसी पोलिसांचे छापे

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वरिष्ठांच्या आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी नवनागापूर व पोखर्डी शिवारात धाडी टाकून सुमारे तीन हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी नवनागापुरातील सह्याद्री चौकात हातभट्टी विक्री करणारा रईस गफ्फार अन्सारी (वय 39 रा. नवनागापूर) याच्यावर कारवाई केली. त्याच्याविरूध्द अंमलदार किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पोखर्डी शिवारात दीपाली आसाराम जाधव (वय 30) ही महिला पाण्याच्या टाकीजवळ हातभट्टी विक्री करताना मिळून आली. अंमलदार भगवान वंजारी यांच्या फिर्यादीवरून तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच ठिकाणी भारत सूर्यभान जाधव हा हातभट्टी विक्री करताना मिळून आला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com