हातभट्टी नष्ट, देशी-विदेशी दारू जप्त

एलसीबीचे चार पोलीस ठाणे हद्दीत छापे
हातभट्टी नष्ट, देशी-विदेशी दारू जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (एलसीबी) एमआयडीसी, श्रीरामपूर, शेवगाव व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी व देशी विदेशी ठिकाणांवर छापे टाकुन आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहे.

या कारवाईत एक लाख 12 हजार 990 रूपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, दोन हजार 200 लीटर कच्चे रसायन व 170 लीटर तयार दारू नाश करून देशी, विदेशी दारू जप्त केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजू पवार (रा. हमीदपूर ता. नगर), श्रीरामपूर पोलीस ठाण्यात एका महिलेविरूध्द, बेलवंडी पोलीस ठाण्यात संपत दगडू माळी (रा. निळोबा नाला, बेलवंडी, ता. श्रीगोंदा), विनोद पंडीत कांबळे (वय 36 रा. माठ, बेलवंडी) विजय विनायक घेंगडे (वय 31 रा. माठ, बेलवंडी), शेवगाव पोलीस ठाण्यात हरीभाऊ रामदास शिंदे (वय 41), अर्जुन व्यंकू शिंदे व अनिल अंबादास शिंदे (तिघे रा. निमगाव भावी ता. शेवगाव) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक ओला, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, शंकर चौधरी, विजय ठोंबरे, विशाल दळवी, राहुल सोळुंके, संतोष लोढे, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, रोहिदास नवगिरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com