तपोवन रोड हातभट्टी दारू विक्रीचे केंद्र

तोफखाना पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा
तपोवन रोड हातभट्टी दारू विक्रीचे केंद्र
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील नव्याने विकसीत होत असलेल्या तपोवन रोड परिसर हातभट्टी विक्रीचे केंद्र बनला आहे. तोफखाना पोलिसांनी कारवाई करून एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी विक्री केली जात आहे.

तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून हातभट्टीची विक्री करणारा साहेबा तायगा शिंदे (रा. वैदुवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 17 लीटर दारू जप्त केली आहे. ही दारू प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये भरून तो विकत होता. दरम्यान तपोवन रोड परिसरात अजूनही हातभट्टी विक्री केली जात असून यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com