<p><strong>श्रीगोंदा l प्रतिनिधी</strong></p><p>महावितरणने राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे.</p>.<p>दरम्यान, करोना काळात महावितरण कडून अनेकांना जादा लाईट बिले काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत. तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता 'हल्लाबोल व ठिय्या' आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, अंबादास औटी, संजयकुमार शेळके, उमेश बोरुडे, महेश क्षिरसागर, योगेश सावंत, संदिप कोकाटे यांनी समस्त जनतेच्या वतीने दिले असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी दिली.</p>