पेटलेल्या मोटारसायकलमुळे अर्धा हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना-
पेटलेल्या मोटारसायकलमुळे अर्धा हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

वीरगाव वार्ताहर

अकोले (akole) तालुक्यातील डोंगरगाव (dongargoan) शिवारातील वनविभागाचे मालकीच्या क्षेत्रात आगीचे लोळ दिसल्याने अचानक गावक-यांची धावपळ उडाली. सर्वजण जमावाने धावून जाईपर्यंत वनविभागाचे अर्धा हेक्टर जंगल जळून गेले होते. हा सारा प्रकार जंगलात पेटलेल्या मोटार सायकलमुळे झाला.

सोमवारी सायंकाळी 6 वा. वनविभागाच्या हद्दीत आगीचे लोळ दिसू लागल्याने डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले आणि गावक-यांनी जंगलाकडे धाव घेतली. त्याठिकाणी मोटारसायकल आगीच्या ज्वाळांनी वेढलेली होती. आजूबाजूच्या जंगलात त्यामुळे आग पसरली. झाडांच्या फांद्या आणि पाल्याचा वापर करुन ही आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत मोटारसायकल आणि अर्धा हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

पेटलेल्या मोटारसायकलमुळे अर्धा हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

मोटारसायकल पुर्ण जळून गेल्याने केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. कंपनी नक्की सांगता येत नसली तरी प्लँटिना कंपनीची ही मोटारसायकल असावी असा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. नंबर प्लेटही पुर्ण जळलेली असल्याने नक्की शोध घेणे अवघड आहे.

ही मोटार सायकल चोरीची असण्याची शक्यता आहे. त्याचठिकाणी एक आगपेटी मिळून आली. मोटार सायकल पेटविली की जंगलाला आग लागल्यानंतर ती आगीने वेढली याचा तपास सुरु आहे. झालेल्या घटनेची खबर डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले यांनी तात्काळ वनखाते आणि पोलिसांना दिली.

पेटलेल्या मोटारसायकलमुळे अर्धा हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी
केतकी चितळे यापूर्वीही 'या' वादांमुळे राहिली आहे चर्चेत

खबर मिळताच वनरक्षक एकनाथ पारेकर, वनकर्मचारी सुनिल गोसावी,बाळासाहेब थोरात, एकनाथ पथवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गावक-यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. जंगलातील झाडांचे मात्र नुकसान झाले नसल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली. सरपंच बाबासाहेब उगले यांचेसहित विजय उगले,नामदेव पानसरे, ज्ञानेश्वर उगले,बाळू उगले,लक्ष्मण उगले,आण्णासाहेब उगले यांनी वनकर्मचा-यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com