गारपीटग्रस्तांना 401 कोटींची मदत

नगर जिल्ह्याला मिळणार 14 कोटी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा
गारपीटग्रस्तांना 401 कोटींची मदत

मुंबई, अहमदनगर |प्रतिनिधी| Mumbai Ahmednagar

राज्यात मध्यंतरी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी महसूल विभागाने 401 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 14 कोटींचा निधी आला आहे.

सन 2021-22 या कालावधीत नगर जिल्ह्यासह राज्यात गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी चारशे एक कोटी सत्तर लाख, सत्तर हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

राज्यात मागील दोन वर्षांपासून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या विभागीय आयुक्तांनी यासाठी मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर महसूल विभागाने या संदर्भात आदेश जारी केले. मदतीची ही रक्कम खातेदार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे आदेश सहकार विभागाने जारी करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com