हागणदारीमुक्त गावांची पुन्हा होणार पडताळणी

घुले, क्षीरसागर यांचा सरपंचाशी स्वच्छता सवांद
हागणदारीमुक्त गावांची पुन्हा होणार पडताळणी
झेडपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे (Union Ministry of Drinking Water and Sanitation) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) निमित्ताने स्वच्छता विषयक उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यात स्वच्छता सर्वेक्षण (Hygiene survey), सर्वेक्षणात उत्कृष्ठ ठरणारे जिल्ह्यांचा सन्मान होणार असून उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याप्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणार्‍या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरत हागणदारीमुक्त गावांची पुन्हा पडताळणी सोबतच शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.

यासंदर्भात सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले (Zilla Parishad President Rajshritai Ghule) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Dr. Rajendra Kshirsagar) यांनी जिल्ह्यातील सरंपच (Sarpanch) यांच्याशी ऑनलाईन स्वच्छता संवाद कार्यशाळा (Online Hygiene Dialogue Workshop) घेतली. यावेळी स्वच्छतेच्या उपक्रमात जिल्ह्यातील गावे आणि सरपंच यांना सहभाग महत्वाचा आहे. यामुळे जिल्हा शाश्वत स्वच्छ होईल, असा विश्वास अध्यक्षा घुले (Zilla Parishad President Rajshritai Ghule) यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच व उपसरपंच ऑनलाईन उपस्थित होते.

या मोहिमेत 1 ते 31 आक्टोबर दरम्यान, ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणात उत्कृष्ठ ठरणारे जिल्हे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्ह्याची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष पाहणी अंतर्गत सरकारी शाळा (Government schools), अंगणवाडी (Anganwadi), प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center), आठवडा बाजार (Week market), धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण (Survey of religious places) केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छते विषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे.

देशभरातून वेगवेगळ्या गावात खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामुहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून तीन ते चार गावाचे सरपंच (Sarpanch), स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आशा सेविका (Asha Sevika) व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल. कार्यशाळेत प्रकल्प संचालक सुरे शिंदे यांनी प्रास्तविक केले. यात गावे अधिक शाश्वत स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे या गावातील महिला बचत गट, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असणारे युवा कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन चळवळ उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

देशाचा स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रमात घोष वाक्य लेखन स्पर्धा, सार्वजनिक ठिकाण भिंती रंगविणे, 100 दिवसांचे शौषखड्डे स्थायित्व व सुजलाम अभियान स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण असे अभियान सुरू आहेत. जिल्ह्यात 40 हजार हजार शोषखड्डे करण्यात येणार असून या अभियानात सरपंचांनी व ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी केले.

Related Stories

No stories found.