राहाता : गटारीच्या पाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था
सार्वमत

राहाता : गटारीच्या पाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था

आ. विखेंच्या सुचनेला पालिकेचा कानाडोळा

Arvind Arkhade

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

शहरातील पिंपळवाडी रोड व नपा वाडी रोडवरील रस्त्यांवरून गटारीचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या समास्यांना सामोरे जावे लागत असून सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, अशा सूचना आ. राधाकृष्ण विखे यांनी देऊनही पालिकेने याकडेे कानाडोळा केला आहे.

शहरालगत असलेल्या शनी प्रभागातील पिंपळवाडी व नपा वाडीला जाणार्‍या दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून या संपूर्ण रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही बाजूला साईड चरांचे अस्तीत्वच नसल्याने तसेच येथील गटारी नादुरूस्त असल्याने त्याचबरोबर अर्ध्या राहाता शहरातील पावसाचे पाणी याच परिसरात येत असून गटारीचे पाणीही त्यात मुक्तपणे रस्त्यांवरून वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिका प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने त्याचबरोबर या प्रभागातील नगरसेवकही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना चार दिवसांपूर्वी राहाता पालिकेत या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती दिली.

त्यांनी तातडीने या रस्त्याचे खड्डे बुजवून दुरूस्ती करण्याच्या व साईड चर करून देण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देऊनही पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने हा गटारीच्या पाण्याचा प्रश्न व रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न बिकट झाला आहे.दोन दिवसांत हा रस्ता साईड गटारीसह दुरूस्त न झाल्यास पालिका पदाधिकार्‍यांचे फलक लावून येथे सत्यनारायण पूजा घालू, असा इशारा या दोन्ही रस्त्यांवरील नागरिकांनी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com