एलसीबीची मोठी कारवाई; 5 लाखांचा गुटखा पकडला

एलसीबीची मोठी कारवाई;  5 लाखांचा गुटखा पकडला

अहमदनगर|Ahmedagar

कारमधून उस्मानाबाद जिल्ह्यात गुटखा घेऊन जाणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये ताब्यात घेत अटक केली. आनंत विलास भालेराव (वय 39), जमीर अब्दुल सत्तार मुला (वय 38), अविनाश चंद्रकांत हातकरे (वय 30 तिघे रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांचा एक साथीदार जमील शेख (रा. तेरखेडा) हा पसार झाला आहे.

पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारची झडती घेतली असता कारमध्ये चार लाख 80 हजार रूपये किंमतीचा पानमसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह कार असा 10 लाख 80 हजार 968 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काही इसम कारमधून उस्मानाबाद जिल्ह्यात गुटखा घेऊन जात असल्याची माहिती सहायक फौजदार मन्सूर सय्यद यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती दिली. त्यांनी एक पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सोमवारी सायंकाळी कोठला येथील फलटण चौकीजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार संशयीत कार आली असताना पथकाने कार अडवून कारमधील तिघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये चार लाख 80 हजार रूपये किंमतीचा पानमसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारसह गुटखा जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com