सव्वा लाखाचा गुटखा जप्त

सहा जणांना अटक
सव्वा लाखाचा गुटखा जप्त
File photo

शिरूर (प्रतिनिधी)

शिरूर पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून १ लाख ३६ हजारांचा गुटखा जप्त केला असून. विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे.

मुकेश चौधरी (२५, रा. अहमदाबाद ता. शिरूर), राहुल कांबळे (२५,), इरफान अन्सारी (२५,), सोहेल तांची ( २३), गणेश मजरतकर (२५), धीरज प्रजापती (२४), रफिक शेख,बापु बोराडे ( रा. सर्व शिरूर ) या आठ जणांवर गुन्हे दाखल करून पैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

लपून गुटख्याची विक्री होत असल्याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम तयार करून अहमदाबाद फाटा येथे सिद्धिविनायक किराणा दुकानात, शिरूर शहरामध्ये इंदीरागांधी पुतळ्या मागे टपरीवर, बोऱ्हाडे मळा येथील अमोल डेअरी याठिकाणी कारवाई केली. या कार्यवाहीत हिरा पान मसाला, विमल व इतर गुटखा असा एकूण १ लाख ३६ हजार, ३५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहा. पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहा. फौजदार नजीम पठाण, पो. हवाअमित कडुस, पो. हवा संजय जाधव, पोना धनंजय थेऊरकर, पोना. नितीन सुद्रिक, पोना बाळू भवर, पोकॉ राजेंद्र गोपाळे, पो.कॉ. वैभव शेलार, पोकॉ. आकाश नेमाने, चा. पोकॉ शंकर चव्हाण यांनी ही कामगिरी केली. ,

Related Stories

No stories found.