गुटखा विक्री करताना पकडूनही कारवाई नाही

गुटखा विक्री करताना पकडूनही कारवाई नाही

तालुका पोलीस संशयाच्या भोवर्‍यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा विक्रीला बंदी (Gutka sale banned in the state) असतानाही संगमनेर तालुक्यात (Sangamner Taluka)मात्र खुलेआम गुटख्याची विक्री (Gutka Sales) सुरू आहे, याचा प्रत्यय काल आला. तालुका पोलिसांनी (Police) एका मोठ्या गुटखा विक्रेत्याला दुपारी गुटख्या सह पकडले मात्र कारवाई न करताच त्याला सोडून देण्यात आल्याचे खात्रीलायक माहिती समजली. यामुळे तालुका पोलिस संशयाच्या (Police suspect) भोवर्‍यात सापडले असून गुटखा विक्रीला पोलिस जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

संगमनेर तालुका (Sangamner Taluka) हा गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनला तालुक्यात दररोज लाखो रुपयांची गुटखा विक्री होत आहे. गुटखा विक्री आणि उत्पादनाला बंदी (Ban on sale and production of gutkha) असतानाही संगमनेर तालुक्यात (Sangamner Taluka) मात्र मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केली जात असून यातून संबंधित गुटखा तीन लाख रुपयांची कमाई करत आहे. या गुटखा किंग कडून तालुक्यात गुटख्याचा पुरवठा केला जातो. खेडेगावातील त्याच्या गोदामांमध्ये लाखो रुपयांचा गुटखा असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील वेल्हाळे शिवारात राहणारा एक विक्रेता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर गुटखा खरेदी करतो. हा गुटखा विक्रेता तालुक्यातील अनेक गावात व संगमनेरच्या (Sangamner) अर्ध्या शहरांमध्ये गुटखा विक्री करत असतो.

या गुटखा विक्रेत्याच्या गोदामात 30 ते 40 गुटख्याचे पोते साठवणूक (Storage) केली जाते. मोठ्या वाहनातून ही गुटखा पोते त्याच्या गोदामाकडे येतात. नंतर मोटरसायकलवरून हा विक्रेता संगमनेर शहर व ग्रामीण भागात गुटख्याची विक्री करतो. आज सकाळी तालुक्यातील एका गावात हा गुटखा विक्रेता गुटख्याची विक्री करत असताना पोलिसांनी (Police) त्याला पकडले दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) आणण्यात आले. त्याच्याकडून काही गुटखा जप्त केल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल असे वाटत असतानाच पोलिसांनी त्याला सोडून दिले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. त्याला का सोडण्यात आले त्याचे विरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

गुटखा किंगचा फोन येताच सुटका ?

एका मोठ्या गावातील एक इसम गेल्या काही वर्षांपासून गुटखा किंग बनला आहे. या गुटखा किंगचा फोन येताच पोलीस ठाण्यात असलेल्या संशयीत आरोपीला सोडण्यात आले. संगमनेर तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री करणार्‍या या आरोपीस पोलिसांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणले होते. दरम्यान मोठ्या हालचाली घडल्या. तालुक्यातील मुख्य गुटखा किंगचा पोलीस अधिकार्‍यांना फोन खणखणला. आणि सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कुठलीही कारवाई न करता या आरोपीस सोडून देण्यात आले. तालुक्यातील गुटखा विक्रीला पोलीस अधिकार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याचे यावरून दिसत असल्याचा आरोप होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com