नगर : गुटख्याची तक्रार करणाऱ्या युवकावर तलवारीने हल्ला

पाच जणांविरुद्ध तोफखान्यात गुन्हा
नगर : गुटख्याची तक्रार करणाऱ्या युवकावर तलवारीने हल्ला

अहमदनगर|Ahmednagar

शहरात विक्री होत असलेल्या अवैध गुटख्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करणाऱ्या युवकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडली आहे.

या हल्ल्यात सनी ज्ञानेश्वर जगधने (वय- २२ रा. कोठला) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे एहसान कासम शेख (रा. झेंडीगेट) व त्यांचे अनोळखी चार साथिदार यांच्या विरोधात शिवीगाळ, मारहाण, आर्मॲक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणार्‍यावर छापेमारी सुरू केली आहे. यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. एहसान शेख शहरात गुटखा विक्री करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज ८ ऑक्टोबर रोजी सनी जगधने यांनी पोलीस अधीक्षक यांना दिला होता.

याचा राग मनात धरून एहसान शेख व त्याच्या चार साथिदारांनी सनी याला आरटीओ कार्यालयासमोर अडविले. एहसान शेख सनी यांना म्हणाला, तु आमच्या नादी लागतोय का, आमच्या विरोधात तक्रार अर्ज देतो काय, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यानंतर एहसान याने त्याच्या जवळील तलवार काढून सनी यांच्या दंडावर मारून जखमी केले. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी सनी जगधने यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरु असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com