
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींचा गेल्या 15 दिवसांपासून शोध लागत नाही
म्हणून या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख प्रकाश पाटील यांनी आदेश दिल्यानंतर शिर्डी पोलीस उपअधीक्षक़ संजय सातव याच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक़ डॉ. दीपाली काळे यांनी दिली.
याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, डीवायएसपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट गुटखा प्रकरणाचा तपास करत होते. मात्र या प्रकरणातील आरोपी नगर जिल्ह्यातच असूनही त्यांचा शोधण्यात अपयश आल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या करीम शेखसह यापूर्वीचे सर्व आरोपींना जामीन व्हावा म्हणून अर्ज न्यायालयात सादर केला. यातील करीम शेख याच्या व्यक्तिरीक्त सर्व आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विजय चोपडा आणि डेंगळे हे दोघेही पसार असून हे दोन्ही आरोपी नगर जिल्ह्यात असूनही त्यांना जेरबद करण्यात श्रीरामपूर पोलीस अपयशी ठरले. या आरोपींच्या शोधासाठी गुजरातला जावून रिकाम्या हाताने परत आले.
जागा मालकाचा संबंधित गुटखा प्रकरणात सहभाग कोणत्या प्रकारे होता किंवा त्यासोबत कोण कार्यान्वित होते. तसेच ज्याठिकाणी गुटखा सापडला आहे त्याठिकानाहुन माल कुठेकुठे व कोण पोहोच करीत असे? आता या प्रकरणात मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून, शिडी पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्याकडे वर्ग केल्यामुळे लवकरच गुटखा प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.