
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील गुटखा प्रकरणात आता नव्याने तीन आरोपींचा समावेश करण्यात आला
असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील मुख्य दोन्ही आरोपींना जामीन मिळाला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात येऊन न्यायालयात त्यांना जामीनही मिळाला आहे. यातील मुख्य आरोपी विजय चोपडा आणि संतोष डेंगळे हे दोन मुख्य आरोपी अद्यापही पसार आहेत.
त्यांना या अगोदर न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. मात्र काल पुन्हा सुनावणी होऊन भादंवि कलम 328 कलमाबाबत वरिष्ठ न्यायालयाने दिलेले निवाडे तसेच अन्न भेसळ व मानके कायद्ा या तरतुदीच्या आधारे न्यायालयाने या दोघांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एन. एम. सलीम यांनी मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने औरंगाबादचे अॅड. चपळगावकर, अॅड. अरीफ शेख, अॅड. जावेद शेख, अॅड. आसने यांनी काम पाहिले.
या प्रकरणाचा तपास करताना बेलापूर येथील सत्तार शब्बीर तांबोळी, पुणे कोंडवा येथील शहाजाद तौफीक खान, सातारा येथील असलम तांबोळी हे तिघे आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत. त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून पोलीस या तिघांचाही समावेश करण्यात आला आहे.
याप्रकरणात आतापर्यंत दहा आरोपी झाले असून यातील सात जणांना अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयाने जामीनही मिळाला आहे. यातील दोन मुख्य आरोपींना काल जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे. या गुटखा प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून लवकरच या प्रकरणातील सर्व आरोपी जेरबंद करून यातील पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. सातव यांनी सांगितले.