दहा लाखांच्या गुटखाप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोतवाली पोलीस करणार तपास
चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिल्लीगेट परिसरातून जप्त करण्यात आलेल्या दहा लाखांच्या गुटखा प्रकरणात दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी फिर्याद दिली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करूनही त्याचा तपास कोतवाली पोलिसांकडे सोपविण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हरिश खंडोजा (वय 36, रा. प्रवरानगर ता. राहाता), दीपक यादव (वय 39, रा. ब्राम्हणगल्ली माळीवाडा) या दोघांना वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. शहरात विक्रीसाठी आणलेल्या 10.74 लाखांचा गुटखा व दोन वाहने शनिवारी सायंकाळी दिल्लीगेट परिसरात असलेल्या पार्किंगमधून जप्त करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या नगर येथील विशेष पथकातील शकील शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दोन वाहने ताब्यात घेतली.

त्यामध्ये 10 लाख 14 हजार 512 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटख्यासह 17 लाख 14 हजार 512 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय अधिकारी कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तोफखाना पोलिसांच्या हद्दीत कारवाई होऊनही या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com