अन्न प्रशासनाने गुटखा पकडला

मंगलगेट परिसरात कारवाई; एकाविरूध्द गुन्हा
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अन्न प्रशासनाने मंगलगेट परिसरातील जेजे गल्लीत मंगळवारी दुपारी कारवाई करून विमल, व्हि 1 तंबाखू, गोवा, हिरा, रॉयल अशा विविध कंपनीचा 38 हजार 662 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप बाबाजी कुटे (वय 44 रा. पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुटख्याची साठवणूक करणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष गोकुळदास साळवे (वय 47 रा. जेजे गल्ली, मंगलगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साळवे याच्या मे.अंबालिका ट्रेडर्स या दुकानात अवैधरित्या गुटखा साठवणूक केला असल्याची माहिती अन्न प्रशासन अधिकारी यांना मिळाली होती. सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, प्र.श.काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी कुटे, शरद पवार यांच्या पथकाने साळवे याच्या दुकानाची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांना विमल, व्हि 1 तंबाखू, हिरा, रॉयल अशा विविध कंपनीचा गुटख्याची साठवणूक केल्याचे निदर्शनास आले. पथकाने साठ जप्त करत त्यातील नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. साळवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com